जालना : जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील मापेगाव पाटीजवळ रविवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा विष्णू लहाने (वय २६ वर्ष, रा. सुरुमगाव) हा सेलू येथे बहिणीला भेटण्यासाठी निघाला होता. सेलूकडे जाण्यासाठी निघालेल्या कृष्णाच्या दुचाकीला तिथे पोहचण्याआधीच मापेगाव पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील शिवम मुंजाभाऊ झोटिंग (वय १९ वर्ष, रा.चिंचोली) हा युवक देखील गंभीर जखमी झालेला होता. अपघातानंतर या दोन्ही जखमींना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

उद्धव ठाकरे मातोश्रीत लपून बसायचे, रश्मी ठाकरे वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या: रामदास कदम

कृष्णा लहाने यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी परतूर येथे घोषित केले, तर शिवम झोटिंग याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले होते. मात्र जालन्यात उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

शिंदे सरकारकडून एसटी महामंडळाच्या निधीला कात्री, सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार?

कृष्णा लहाने हा परतूरहून बहिणीला भेटण्यासाठी सेलूकडे जात असताना हा अपघात घडला आहे. सुरुमगाव येथील कृष्णा लहाने याचे परतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार, पोलीस कर्मचारी रामदास फुफाटे, होंडे, विकास घाडगे यांनी धाव घेत अपघातग्रस्त युवकांना दवाखान्यात भरती करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या विचित्र अपघातात दोघांचे जीव वाचवण्यात यश न आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळावरून दुचाकींना बाजूला काढून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here