Maharashtra Politics | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

 

Uddhav Thackeray Ramdas Kadam
उद्धव ठाकरे आणि रामदास कदम

हायलाइट्स:

  • हो तुम्हीच बाळासाहेबांचे पुत्र आहात
  • आम्ही कधी नाही म्हटलंय का?
  • पण त्यांचे नाव वारंवार का घ्यावे लागते
मुंबई: उद्धव ठाकरे हे सतत ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे’ असे सांगत असतात. ही गोष्ट त्यांनी किती वेळा सांगावी. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असण्याबद्दल तुम्हाला संशय आहे का, असे आक्षेपार्ह वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले. शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठा केलेला नाही. अनेक शिवसैनिकांचे खून झालेत, अनेकजण जेलमध्ये गेलेत, अनेक शिवसैनिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तेव्हा ही शिवसेना मोठी झाली आहे. यामध्ये तुमचं योगदान काय आहे, असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. उद्धव ठाकरे केवळ मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे वारंवार सांगत असतात. अरे पण ही गोष्ट कितीवेळा सांगाल. त्याबद्दल कोणाला संशय आहे का? हो, हो तुम्हीच बाळासाहेबांचे पुत्र आहात, आम्ही कधी नाही म्हटलंय का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहातच ना. पण त्यांचे नाव वारंवार का घ्यावे लागते. तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्त्व आहे की नाही, असा बोचरा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. ते रविवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
उद्धव ठाकरे मातोश्रीत लपून बसायचे, रश्मी ठाकरे वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या: रामदास कदम
यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.
अंबानींनी कोर्टात ३२ वकील उभे केले होते, पण शेवटी मीच जिंकलो: रामदास कदम

सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार

रामदास कदम यांच्या आक्रमक भाषणानंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. रामदासभाई, आपण आज जी भाषा वापरली, त्या पातळीला उतरून आम्ही बोलणार नाही. कारण आमच्यावर आमच्या नेतृत्त्वाचे आणि कुटुंबीयांचे संस्कार आहेत. बाळासाहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं नाव वजा केल्यास आयुष्यात किती पदं मिळवू शकला असता?, हे तुमच्या अंतर्मनाला विचारा, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here