beed live news marathi, बीडमध्ये अपंग अल्पवयीन मुलीसोबत घडला भयंकर प्रकार, घटना वाचून तुम्हीही सून्न व्हाल – a disabled minor girl was abused by her father in beed
बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी इथे अपंग अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नराधम पित्या विरोधात गेवराई पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रतन लक्ष्मण गोरे असं आरोपीचं नाव आहे. रतन गोरेने काल दुपारी आपल्या राहत्या घरी अपंग मुलीवर बलात्कार केला. पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील निर्दयी बापाला गेवराई पोलीसांनी अटक केली. Pune Crime : पुण्याच्या भाईला बर्थडे पडला महागात, ५ महिन्यानंतर पोलिसांनी असा दाखवला खाक्या गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी गावात घडलेल्या प्रकाराने खरंतर बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना ऐकूनच माणसाला प्रचंड राग येईल. मात्र, अस्तित्वात ही घटना घडली आहे. दुर्दैवी म्हणजे अपंग मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना काल घडली. ही बातमी वाऱ्यासारखी गावातच नव्हे तर जिल्हाभरात पसरली.
या घटनेवर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.