बीड : दोन दिवसांपूर्वीच बुलढाण्याच्या मलकापूर येथे एसटी बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे अपघात होऊन दोन तरुणांचे हात कापल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर नादुरुस्त असलेल्या एसटी बस न तपासताच रस्त्यावर कश्या धावतात हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मलकापूरची ही घटना ताजी असतानाच इकडे बीड जिल्ह्यातल्या गेवराईत देखील अशीच एक एसटी बस पाहायला मिळाली. या बसच्या पाठीमागचे बंपर अक्षरशः रोडवर घासत होतं. या तुटलेल्या बंपर मुळे किती मोठा अपघात होऊ शकतो हे या व्हिडिओतून लक्षात येऊ शकते.

मला कारस्थानाने मुख्यमंत्री पदावरून काढले आणि राज्यपाल पदी पाठवले

मात्र, हा व्हिडिओ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. याआधी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती करायची की काय एसटी महामंडळाला हेच कळेना झालंय. मात्र, या व्हिडिओची महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन ने पडताळणी केली असता ही बस भिवंडी आगाराची असल्याचं गेवराई येथील आगार व्यवस्थापकांनी सांगितलं.

आगार व्यवस्थापकांनी हे स्पष्ट केलं की, जर आमच्या आगारात ही बस आली असती तर आम्ही दुरुस्त देखील करून दिली असती. मात्र, निष्काळजीपणामुळे हा सर्व प्रकार झाल्याचं यावरून स्पष्ट होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातला हा जरी व्हिडिओ असला तरी मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल होत असल्याने व्हिडिओ पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Raj Thackeray: विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करावा का? राज ठाकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here