मुंबई- टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना आणि उर्फी जावेद यांच्यात सध्या कॅटफाईट सुरू आहे. उर्फी आणि चाहत एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. गुंड सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चाहतचं नाव पुढे आलं. अशा परिस्थितीत जेव्हा उर्फीने चाहतची खिल्ली उडवली तेव्हा चाहतनेही प्रत्युत्तर दिलं आणि आता दोन्ही अभिनेत्री सतत एकमेकांवर आरेप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

बारावी शिकलेली कोल्हापूरची गृहिणी झाली करोडपती, वाचा कविता चावला यांची हृदयस्पर्शी कहाणी

चाहत खन्नाने केला उर्फीवर हल्ला

चाहतने सुकेशची तुरुंगात भेट घेतली होती आणि त्याच्याकडून मौल्यवान भेटवस्तूही घेतल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर उर्फीने चाहतवर कमेंट केली. चाहतने रागाने उर्फीला दीदी म्हणून हाक मारली होती, तर उर्फीने त्याला उत्तर म्हणून चाहतला आंटी म्हटले. एवढंच नाही तर उर्फीने चाहतला गोल्ड डिगरही म्हटले. आता चाहतने उर्फीवरही जोरदार प्रहार केला आहे.


चाहत खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘सत्य जाणून न घेता प्रसिद्धीसाठी उडी मारणे म्हणजे स्वतःला मूर्ख बनवण्यासारखे आहे. बुद्धीहीन लोकांसोबत काय वाद घालायचा. शहाणी असती तर काम केले असते किंवा शूट केले असते, सेमी न्यूडमध्ये फिरत राहिली नसती. चला काही नाही, तू काकू, बायको किंवा आई होण्याच्या लायकीची नाहीस, आता इतरांना आंटी म्हणण्यात आनंदी राहा. अल्लाह तुला सद्बुद्धी देवो.’

‘सेल्फी’चा वाद! निर्मात्याने कथा चोरी केल्याचा मराठमोळ्या अभिनेत्रीचा आरोप

चाहत इन्स्टा पोस्ट

उर्फीने चाहतला काय दिले उत्तर?

तत्पूर्वी, चाहत खन्नाच्या टोमण्याला उत्तर देताना उर्फीने लिहिले की, ‘तुझ्या घटस्फोटाबद्दल बोलून मला वाईट वाटले. एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू घेण्यासाठी तुरुंगात जाण्यासाठी मी तुला सॉरी का म्हणेन? स्वत:ची लाज काढणं थांबव. उर्फी पुढे म्हणाली की, ‘तू माझ्या कपड्यांवर टिप्पणी केलीस, तर तू स्वत: पैसे घेण्यासाठी तुरुंगात एका अज्ञात व्यक्तीला भेटलीस. तुझ्यासोबत कोणतीही स्पर्धा नाही.’


एवढं बोलून उर्फी थांबली नाही ती पुढे म्हणाली की, ‘पण हो, मला माफ कर. मला वाटलं की माझ्याशी वाद घालणं हा तुझ्या कारकिर्दीतला महत्त्वाचा क्षण असेल, पण या वादात तुला कोणीही हरवू शकत नाही. तू नेहमीच गोल्ड डिगर म्हणून ओळखली जाशील आणि मी चित्रविचित्र कपडे घालणारी मुलगी म्हणून ओळखली जाईन. माझ्यामते दुसरं जास्त चांगलं आहे.’ उर्फीच्या या हल्ल्याला आता चाहतनेही उत्तर दिलं आहे. दोघांची कॅट फाईट पाहिली तर हा वाद इतक्या लवकर थांबणार नाही असं दिसतं.

फिटनेस फ्रीक मलायका अरोरा, शॉर्ट ड्रेसमधल्या योगा लूकवरून नजर हटणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here