धुळे : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून इकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भाजपने निर्विवाद यश संपादित केले आहे. शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरीश भाई पटेल यांचे निर्विवाद वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ३३ पैकी तब्बल ३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील मोहिदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आले आहेत. तर एका ग्रामपंचायत वर काँग्रेस आली असून उर्वरित सर्व ३१ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचे अमरीश भाई पटेल यांचे वर्चस्व दिसून आले आहे.

Aurangabad Crime News : पती पासून विभक्त, महिलेने उसने पैसे घेतले; नंतर जे घडलं…
शिरपूर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या १३३ प्रभागांमध्ये ३३९ सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली. तर ३३ ग्रामपंचायतींच्या थेट जनतेमधून सरपंच निवडीपदासाठी मतदान घेण्यात आले. या तालुक्यात ७९.५० टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये ३० हजार ५६३ महिला तर ३३ हजार ७५७ पुरुष अशा ६४ हजार ३२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. शिरपूर तालुक्यात भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व असल्याने या ग्रामपंचायतींमधून बहुसंख्य ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीकडे जाणार असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच दिसून येत होते.

निकालात ३१ ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीकडे गेल्याचे स्पष्ट झाले असून अवघी एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसला ते एक काँग्रेस पक्षाला घेता आली आहे. शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला या तालुक्यांमध्ये भोपळाही फोडता आला नसून अमरिशभाई पटेल यांनी पुन्हा शिरपूर तालुक्यात आपलेच वर्चस्व कायम असल्याचे दाखऊन दिले आहे.

आधी राठोडांसाठी नडले, आता ठाकरेंच्या साथीनं राठोडांनाच भिडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here