२ सप्टेंबरला व्हॉट्स नंबरवरून फोन आला आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली, असा दावा डॉक्टरांनी केला होता. हिंदू संघटनांशी स्वत:ला जोडून त्यांच्यासाठी खूप काम करतो. त्यामुळे आता तुझं शिर धडावेगळं करण्यात येईल. तुझी रेकी करण्यात आलेली आहे, असं वत्स यांनी सांगितलं होतं. मात्र तपासातून वेगळीच माहिती समोर आली आहे. डॉक्टरांना बिहारमधील एका रुग्णानं इंटरनेट कॉल केला होता. याच नंबरवरून आपल्याला धमकी मिळाल्याचा कांगावा डॉक्टरांनी केला. प्रसिद्ध होण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचं तपासातून उघडकीस आलं आहे.
२ सप्टेंबरला ज्या नंबरवरून फोन आला, त्याच नंबरवरून ७ सप्टेंबरला पुन्हा कॉल आल्याचं तक्रारदार डॉक्टरांनी म्हटलं होतं. हिंदू संघटनांसाठी काम करणं बंद न केल्यास शिरच्छेद करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही तुला वाचवू शकणार नाहीत, असा दावा वत्स यांनी केला होता. व्हॉट्स ऍपवर ३ फोटो पाठवण्यात आले होते, असं वत्स यांनी पोलिसांना सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
ghaziabad doctor, सिर तन से जुदा! धमकी मिळाल्याचं म्हणत डॉक्टरांनी पोलीस ठाणे गाठले; तपासानंतर स्वत:च अडकले – ghaziabad doctor booked for fake sar tan se juda complaint
गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या डॉक्टर अरविंद कुमार वस्त यांनी त्यांना धमकी मिळाल्याचा दावा केला होता. आपल्याला ठार मारण्याची धमकी व्हॉट्स ऍप कॉलच्या माध्यमातून मिळाल्याचं वत्स यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. याचा तपास पोलिसांना केला. त्यातून हा संपूर्ण प्रकारच बोगस असल्याचं सत्य उघडकीस आलं. सायबर सेलनं या प्रकरणाचा तपास केला.