तोट्यातले साखर कारखाने विकत घ्यायचे आणि आपल्या पॅटर्नने संबंधित साखर कारखान्यांना फायद्यात आणायचं यामुळे अभिजीत पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाले. परंतु त्याच दरम्यान त्यांच्यावर आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली. गेल्या महिन्यात अभिजीत पाटील यांच्या कारखान्यांवर धाडी पडल्या. तेव्हापासून पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र अभिजित पाटलांना आता आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे ते ना राष्ट्रवादीला दुखावतात ना भाजपला.. कारण, सुभाष देशमुखांशी जवळीक असलेले अभिजित पाटील भाजपच्याही तेवढेच जवळचे आहेत.

 

Sharad Pawar Meet Abhijeet patil
शरद पवार आणि अभिजीत पाटील

हायलाइट्स:

  • अभिजीत पाटील आणि शरद पवार यांची भेट
  • अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर असलेल्या उद्योजक अभिजीत पाटील यांची आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. आयकर विभागाच्या कारवाईनंतर अभिजीत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या दिवसांपासून चर्चा रंगत होत्या. आज सोलापूर दौऱ्यावर असलेल्या पवारांनी अभिजीत पाटील यांना भेटून त्यांच्याशी काही वेळ हितगुज केलं. अभिजीत पाटील राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवायची तयारी करत असल्याच्याही चर्चा होत्या. पण आयकर विभागाच्या चौकशीनंतर मात्र पाटलांनी ‘वाट’ बदलल्याची कुजबूज होती.

तोट्यातले साखर कारखाने विकत घ्यायचे आणि आपल्या ‘पॅटर्न’ने संबंधित साखर कारखान्यांना फायद्यात आणायचं. यामुळे अभिजीत पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले. परंतु त्याच दरम्यान त्यांच्यावर आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली. गेल्या महिन्यात अभिजीत पाटील यांच्या कारखान्यांवर धाडी पडल्या. तेव्हापासून पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता.

माढा तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती तसेच विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आज माढा दौऱ्यावर होते. याच दौऱ्यात पुतळ्याचं उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी शेतकरी मेळावा घेतला. हा मेळावा आटपून निघताना त्यांनी अभिजीत पाटील यांची भेट घेतली. कार्यक्रम स्थळावरुन निघताना आपल्या गाडीत अभिजीत पाटलांना शेजारी बसवून त्यांच्याशी काही काळ गप्पा मारल्या. या भेटीत पवारांनी अभिजीत पाटलांना कोणता कानमंत्र दिला? दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली? याचे तपशील सध्या समोर आलेले नाहीयेत. मात्र शरद पवार यांच्या कानमंत्राने अभिजीत पाटील पुन्हा घड्याळाची टिकटिक ऐकून येत्या दोन वर्षात टायमिंग साधणार का? याकडे सोलापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय.

अभिजित पाटील कोण आहेत?

  • अभिजित पाटील वाळू ठेकेदार होते
  • तुकाराम मुंडेंच्या काळात अनेक गुन्हे दाखल झाले
  • तीन महिने तुरुंगात रहावं लागलं
  • बाहेर आल्यानंतर अभिजित पाटलांनी ट्रॅक बदलला
  • आधी धाराशिव कारखाना, नंतर नांदेड, नाशिकलाही कारखाना चालवायला घेतला
  • २० वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला
  • ३५ दिवसातच सांगोला कारखाना त्यांनी रुळावर आणला
  • यामुळेच गेल्या २ वर्षांपासून बंद विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांची पसंती

अभिजीत पाटलांची राष्ट्रवादीशी जवळीक

एक कारखाना चालवणंही अनेक नेत्यांना जमत नसल्याचं आपण पाहतो, शेतकऱ्यांची बिलं तशीच अडकून राहतात.. पण अभिजित पाटलांनी पाच वर्षात पाच कारखाने चालवायला घेऊन शेतकऱ्यांनाही खूश केलंय.. अभिजित पाटलांना आता आमदारकीचीही स्वप्न पडू लागलीय.. त्यामुळे ते ना राष्ट्रवादीला दुखावतात ना भाजपला.. कारण, सुभाष देशमुखांशी जवळीक असलेले अभिजित पाटील भाजपच्याही तेवढेच जवळचे आहेत.. पण पंढरपूर मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा आहे आणि २०२४ लाही समाधान औताडे यांनाच संधी मिळण्याची दाट शक्यता दिसते.. कदाचित त्यामुळेच अभिजित पाटील यांनी जसे कारखाने जिंकले, तसंच ते राष्ट्रवादीचं मनही जिंकण्याचा प्रयत्न करत असतात.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here