उस्मानाबाद: कुत्र्याने मटण खाल्ले या किरकोळ कारणासाठी चक्क पित्यानेच मुलीवर गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा प्रकार तुळजापूरमध्ये उघडकीस आला आहे. या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कार्ला येथे घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या दोघा पती- पत्नींनी रविवारी त्यांची मुलगी काजल मनोज शिंदे (वय २२) वर्षे हिस कुत्र्याने मटण खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. त्यानंतर गणेश भोसले यांनी त्यांच्याजवळील गावठी रिव्हॉल्व्हरमधून काजलवर गोळी झाडली. यामध्ये काजल गंभीररित्या जखमी झाली.

हा प्रकार समजल्यानंतर काजलचे नातेवाईक विशाल जयराम भोसले यांनी तिला तुळजापुर उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना काजलचा मृत्यू झाला. तसेच गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे, रा. कार्ला यांसही ठार मारण्याची धमकी दिली. मनोज सुनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्ररीवरुन भा.दं.सं. कलम- 302, 504, 506, 34 अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी तुळजापूर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती सई भोरे-पाटील यांसह नळदुर्ग पो.ठा.चे सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here