Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 20, 2022, 10:38 AM

Vijay Mane Duplicate CM | विजय नंदकुमार माने याच्यावर पुणे शहर गुन्हे शाखेने कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) असे गुन्हे लावणे प्रथमदर्शनी चुकीचे वाटते. आम्ही याची माहिती घेणार आहोत. त्यांनी फसवणूक केली असेल तर तो गुन्हा ठरू शकतो.

 

CM Eknath Shinde Duplicate
एकनाथ शिंदेंचा डुप्लिकेट

हायलाइट्स:

  • माझे म्हणणे केवळ या FIR च्या संदर्भात आहे
  • असे गुन्हे लावणे प्रथमदर्शनी चुकीचे वाटते
  • आम्ही त्यांना आंबेगाव येथे जाऊन भेटू
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डुप्लीकेट म्हणून अल्पावधीत नावरुपाला आलेले विजय माने हे सध्या अडचणीत सापडले आहेत. पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ याच्यासोबतची त्यांची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादाला तोंड फुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने विजय माने (Vijay Mane) हे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे (Asim Sarode) हे विजय मानेंच्या मदतीला धावून गेले आहेत. विजय नंदकुमार माने हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सारखा दिसतो यामध्ये त्याचा काहीही दोष नाही. तो एकनाथ शिंदेच्या सारखा दिसतो याचा त्याने गैरफायदा घेतला असेल, मीच एकनाथ शिंदे आहे असे म्हणून कुणाची फसवणूक केली असेल तर तो गुन्हा ठरू शकतो व तशी तक्रार ज्याची फसवणूक झाली असेल त्या व्यक्तीने देणे आवश्यक आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

विजय नंदकुमार माने याच्यावर पुणे शहर गुन्हे शाखेने कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) असे गुन्हे लावणे प्रथमदर्शनी चुकीचे वाटते. आम्ही याची माहिती घेणार आहोत. जर त्याने एकनाथ शिंदे यांची बदनामी केली असेल तर एकनाथ शिंदे यांनी विजयकुमार माने याच्याविरुद्ध तक्रार देणे आवश्यक असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले.
पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश
मला विजय माने यांच्याबद्दल काहीही माहिती नाही पण माझे म्हणणे केवळ या FIR च्या संदर्भात आहे. इतके नक्की की पोलिसांची विजय माने याच्याविरुद्ध कारवाई प्रथमदर्शनी अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची व बेकायदेशीर आहे असे दिसते. विजय माने बाहेरगावी गेले आहेत. आम्ही त्यांना आंबेगाव येथे जाऊन भेटू किंवा ते आमच्या ऑफिसला येतील व आमची चर्चा होईल. आम्ही विजय माने विरुद्ध दाखल झालेला FIR रद्द करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी त्यांना मदत करावी असे ठरवले आहे, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.
शिंदे सरकारकडून एसटी महामंडळाच्या निधीला कात्री, सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार?

विजय माने काय म्हणाले?

मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत.त्यांची प्रतिमा कधी मलिन होईल असे कार्य मी कधी केले नाही आणि करणारही नाही. कारण एकनाथ शिंदे माझ्यासाठी गुरुसमान आहेत. तरी काही लोकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी मुख्यमंत्र्यांची कधी बदनामी केलेली नाही, समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी अशी कोणतीही भावना नाही की मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का लागेल, तरी मला सर्वांनी सहकार्य करावे. महाराष्ट्रातील जनता माझ्या पाठीशी उभी राहील अशी अपेक्षा विजय माने यांनी व्यक्त केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here