मुंबई : राज्यात गणेशोत्सवानंतर मुसळधार पाऊस झाला. पण आता हाच पाऊस परतीच्या मार्गावर आहे. भारतात मोसमी पावसाच्या परतीचे वेध लागले आहेत. हवामान खात्याकडून पुढच्या एक-दोन दिवसांत राजस्थानसह उत्तर भारतामध्ये मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यानंतर महाराष्ट्रातही आठ ते दहा दिवसानंतर परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातलं. राज्यात सध्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामान राहील.

MaTa Superwoman : पोटच्या लेकराला गतीमंदत्व आलं म्हणून ही माऊली ८० मुलांची आई झाली; वाचा हर्षाली चौधरींचा प्रेरणादायी प्रवास

दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावरदेखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पुढच्या दोन दिवसांमध्ये उत्तर भारताच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा…

महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागांमध्ये २० ते २२ सप्टेंबर या काळात विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल. पुणे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही पुढच्या तीन-चार दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कमी राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Pune : हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर हल्ला प्रकरण; तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here