मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव समजला जाणारा क्रिकेटशिवाय आणि क्रिकेट सचिनशिवाय अपूर्ण आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सचिनला मैदानात खेळताना पाहणं म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी जणू पर्वणी असते. अनेक जण तर सचिनचा आदर्श समोर ठेवत आपले क्रिकेटमधील करिअर घडवत आहेत. सचिनचे भारतात, विदेशात आणि जगाच्या कानाकोपर्‍यात चाहते आहेत. तर सचिनने त्याच्या अशाच एक अफलातून चाहत्याची इंदूरमध्ये भेट घेतली .

महाराष्ट्रातील हा सचिन तेंडुलकरचा जबरा फॅन आहे. त्याने आपला एक सायकल प्रवास सचिनला समर्पित केला आहे. नारायण व्यास यांनी सायकलवरुन अनेक किलोमीटरचे प्रवास केले आहेत. वाशीम ते लालबाग (मुंबई), वाशीम ते वाघा बॉर्डर (पंजाब), आणि वाशीम ते रामसेतू (तामिळनाडू) असा प्रत्येकी ६००, १८०० आणि २००० किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून वाशिमच्या नारायण व्यास यांनी शारीरिक फिटनेससोबतच शांती, एकात्मता आणि पर्यावरण सरंक्षणाचा संदेश दिला.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात राज्यातील विविध शहरांदरम्यान फिटनेसचा संदेश देत ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत पोहोचणार आहेत. १५५१ किलोमिटरचा हा प्रवास ७ दिवसात पूर्ण करणार असल्याचे व्यास यांनी सांगितले.

सायकल प्रवास सचिनला केला समर्पित

हा ध्येयवेडा सायकलपटू एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या निर्धारानुसार, १५ सप्टेंबरपासून दिल्लीच्या इंडिया गेट ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत १५५१ किलोमीटरचा टप्पा सायकलने गाठण्यासाठी रवाना झाले असून त्यांनी ही सायकलवारी देशाचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला समर्पित केली आहे.

आणि वाटेतच भेटला ‘क्रिकेटचा देव’ सचिन……

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला समर्पित असलेला हा सायकल प्रवास पूर्ण करत असताना मध्य प्रदेश मधील इंदूर येथे नारायण व्यास यांची सचिन तेंडूलकरने भेट घेतली.
रोड सेफ्टी क्रिकेट लीगसाठी सचिन इंदूर येथे आला असताना त्यांनी नारायण यांच्याशी संपर्क करून सायकल प्रवासाबद्दल आभार मानले तसेच सचिनने स्वतःची जर्शी ऑटोग्राफसह नारायण यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

नारायण व्यास यांनी सचिनसोबतचे फोटो ट्विटरवर शेयर करत सचिनचे आभार मानले आहेत. सचिन तेंडुलकरची भेट झाल्याने आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here