CM Eknath Shinde | उद्धव साहेबांनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी. यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी.

 

Supriya Sule Eknath Shinde
सुप्रिया सुळे आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • दिलदार विरोधक नसतील तर राजकारणाला आणि समाजकारणाल अर्थ उरत नाही
  • हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे
  • एखादा नेता फक्त पदाने मोठा होत नाही
पुणे: मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आडकाठी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. आमच्याही काळात दसरा मेळावा व्हायचा. दसरा मेळाव्याच्या (Dasra Melava) व्यासपीठावरून आमच्यावरही जोरदार टीका व्हायची. पण आम्हीदेखील या सगळ्याकडे उत्सुकतेने पाहत असू. दिलदार विरोधक नसतील तर राजकारणाला आणि समाजकारणाल अर्थ उरत नाही. सध्या दसरा मेळाव्याबाबत जे काही घडत आहे ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे आहे. एखादा नेता फक्त पदाने मोठा होत नाही. तो कर्तृत्त्ववान आणि दिलदार असायला हवा, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.
Dasara Melava: शिवसेनेचं ठरलं! दसरा मेळावा शिवतीर्थावरच; शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा प्लॅन तयार
तर दुसरीकडे अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मागणी केली. उद्धव साहेबांनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी. यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी. राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळावेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

तुम्ही यंदाही दसरा मेळावा घरात बसून ऑनलाईनच घ्या, शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटाला डिवचलं

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला जास्त जागा: अजित पवार

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचे निकाल नुकतेच जाहीर झाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर होत नाहीत. उद्या एखाद्या सरपंचाने लिहून दिले की, मी अमक्या-तमक्या पक्षाचा आहे, तर ठीक आहे. पण एकंदरित परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या आहेत. या सगळ्यातून राजकी पक्षांनी बोध घेतला पाहिजे, लोकांच्या अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे जे लोक निवडून आले आहेत, त्यांचे अभिनंदन असे अजित पवार यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here