Authored by अमोल सराफ | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 20, 2022, 1:25 PM

Buldana Accident News : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरामध्ये एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील ८ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.

 

Buldana Accident News
Buldana Accident News : आई-वडिलांच्या डोळ्या देखत चिमुकल्याचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

हायलाइट्स:

  • भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले
  • भीषण अपघातात ८ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
  • बुलडाण्यातील नांदुरामधील मन हेलावून टाकणारी घटना
बुलडाणा : दोन दिवसांपूर्वीच एसटी बसचा भीषण अपघातामध्ये दोन युवकांनी हात गमावल्यानंतर आता पुन्हा एकदा रस्ते नांदुरा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एका आठ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर त्याचे आई-वडील हे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा बायपासनजीक एका ढाब्याजवळ घडली. अपघातातील जखमी वडील दरबारसिंग डाबेराव हे सैन्यात कार्यरत असल्याची माहिती आहे. दोघांवर खामगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त डाबेराव कुटुंब दुचाकीने नांदुराकडे जात होते. ट्रक क्रमांक ओडी. ०५ जे २०३५ खामगावकडे येत होता. यावेळी दोन्ही वाहनात झालेल्या अपघातात दुचाकीवर असलेल्या आयुष दरबारसिंग डाबेराव (वय ८) या बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सैन्यात कार्यरत त्याचे वडील दरबारसिंग डाबेराव ( वय ३२), त्यांची पत्नी माधुरी डाबेराव (रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जा.) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Raj Thackeray : आली लहर केला कहर! राज ठाकरेंकडून चार केक खरेदी, कारण विचारल्यावर म्हणाले…
मृत आयुषचे शवविच्छेदन रविवारी सकाळी नांदुरा येथे करण्यात आले. जखमी सैनिक काही दिवसांपूर्वीच सुटीवर आल्याची माहिती आहे. याप्रकरणी जलंब पोलिसात अद्याप फिर्याद दाखल झालेली नाही. पुढील तपास ठाणेदार धीरज बोर्डे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे. ८ वर्षांच्या आयुषचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूरच्या कविता चावलांचं करोडपती होण्याचं स्वप्न २२ वर्षांनी पूर्ण

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here