car falls into river, पूर आल्याने कार थेट नाल्यात कोसळली: चालक गेला वाहून; ४ जण थोडक्यात बचावले – car falls into stream due to floods in mukhed taluka driver missing latest updates
नांदेड : मुखेड तालुक्यातील दापका राजा ते हिप्परगा या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आल्याने कारसह एक व्यक्ती वाहून गेली आहे. अझहर सत्तार शेख असं बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तसंच गाडीची काच फोडून बाहेर पडल्याने चार जण सुखरूप बचावले आहेत. अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्याच्या हाडोळती येथील ५ तरुण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील वलीमा कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गावाकडे जात असताना या तरुणांची कार (क्रमांक एमएच-१४, बीआर ३०२१ ) दापकाराजा पुलावरून खाली कोसळली. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या चार जणांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर उडी टाकून जीव वाचवला. मात्र कारचा चालक पाण्यात बेपत्ता झाला आहे. Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचा मराठा आरक्षणाबाबात मोठा निर्णय, भाजप मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक विजय गोबाडे यांच्यासह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस, स्थानिक नागरिक, तहसीलच्या पथकांनी तसेच रेस्क्यू टीमने मंगळवारी पहाटे अपघातग्रस्त कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बेपत्ता कारचालकाचा शोध घेण्यात येत आहे.