पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकू येणारी एक खास भेटवस्तू सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आता मोदींचा आवाज ऐकायला येणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राज ठाकरेंना सदिच्छा भेट म्हणून एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करुन दिलं आहे. त्यासोबत एक राष्ट्रध्वजाचं सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. या सन्मान चिन्हामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक रेकॉर्डेड घोषणा ऐकू येत आहे. “वंदे मातरम” अशी ती घोषणा आहे. त्यानंतर त्यात “वंदे मातरम” गाणं देखील ऐकायला येणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी चंद्रपूर शहरातील एन.डी.हॉटेल येथील केक शॉप येथे जाऊन स्वखर्चाने चार केक खरेदी केले आणि हॉटेलमधील रुमच्या दिशेने निघाले. अचानक केक खरेगी करण्याचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता, केक खरेदी करण्याचं काही विशेष कारण नसल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे चंद्रपुरात मुक्कामी असून आज सकाळी ते स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते पुढे अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.