
पहिल्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी, जाणून घ्या…
मोहालीच्या मैदानात आतापर्यंत भारताने बरेच सामने जिंकले आहेत. पण काळानुरुप मोहालीच्या मैदानाची खेळपट्टी बदलली आहे. यापूर्वी मोहालीची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी पोषक समजली जायची. पण कालांतराने खेळपट्टीमध्ये बदल झाला आणि आता या खेळपट्टीवर चांगल्या धावाही होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण तरीही या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत असते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळू शकते. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीची काही षटकं ही वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे या सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाज लवकर विकेट्स मिळवू शकतात. पण कालांतराने चेंडू जसा जुना होत जाईल, तशी ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक ठरू शकते.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ :
ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.