वाशिम (देव इंगोले) : अपहरण व पळवून नेलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी वाशिम पोलिसांनी विषेश मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल आठ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी शिर्डीमध्ये मिळून आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत ८ मुलींचा शोध घेण्यात वाशिम पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं आता सध्या सर्वत्र कौतूक होत आहे. मात्र, या घटनेबाबत नवीन अपडेट ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’च्या हाती लागली आहे.

ही कहाणी आहे वाशिमच्या एका दाम्पत्याची शिवानी आणि विरु (दोघांचीही नावे बदललेली) दोघंही एकाच गावातील रहिवासी. या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं त्यांनी आयुष्य भर एकमेकांची साथ देण्याच्या आणा-भाका घेतल्या. पण यात मोठा अडसर होता तो म्हणजे आडनावाचा दोघांचही आडनाव एकच. समाजाच्या दृष्टीने दोघेही भावकीतली. यामुळे लग्नाला मान्यता मिळणे दुरापास्तच होतं. पण ते दोघे मात्र ठाम की आपल्याला लग्न करायचं. त्यांनी एक दिवस पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबामातेच्या दर्शनाला जाताय?; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मोठी घोषणा, वाचाच…
२०१४ मध्ये ते घर सोडून पळाले त्यानंतर दोघांनी लग्न केलं. मुबई – पुणे – औरंगाबाद अशा मोठ्या शहरात मिळेल ते काम करत शेवटी ते शिर्डीमध्ये मागील काही वर्षांपासून स्थायिक झाले. इकडे मुलीच्या वडिलांनी मुलाविरोधात मुलीला पळवून नेल्याचा वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला. सुरवातीला काही दिवस पोलिसांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला खरा मात्र ते दोघेही वारंवार त्यांचं ठिकाण बदलवत असल्याने पोलिसांना त्यांचा पत्ता मिळत नव्हता. शेवटी पोलिसांनी केस थंड बस्त्यात टाकली आणि घरच्यांनी मुलगी परत येण्याची आशा सोडली. त्यानंतर वाशिमचे विद्यमान पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी जिल्ह्यातून हरवलेल्या पळून नेलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केलं आणि या केसचा पुन्हा एकदा तपास सुरू करण्यात आला.

दरम्यान, तब्बल आठ वर्षांचा काळ लोटल्याने सगळं काही सुरळीत सुरु असल्यामुळे मुलाचाही त्याच्या घरच्यांशी संपर्क सुरु झाला होता. याचाच धागा पकडत सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी या दोघांना शिर्डीत ताब्यात घेतलं. मुलगी सांगत होती “मी माझ्या मर्जीने आली आहे”. मुलगा सांगत होता “आमच्या दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे”. पण पोलिसही काही करु शकत नव्हते. कारण २०१४ मध्ये जेव्हा मुलगी पळाली होती तेव्हा ती अल्पवयीन होती.

पोलिसांनी त्या दोघांना वाशीमला आणलं त्यानंतर मुलीच्या आई वडिलांना बोलावून मुलगी त्यांच्या ताब्यात दिली आणि मुलाला अटक केली. यामुळे त्या दोघांच्याही मर्जीने सुरु असलेला आठ वर्षाचा सुखी संसार कायद्यामुळे तुटण्याची शक्यता होती. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं. मात्र, मुलीच्या आई-वडिलांसमोर मुलीचा आठ वर्षाचा सुखी संसार तोडण्याचा बाका प्रश्न उभा राहिला होता. त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि मुलीला तिच्या मर्जीने परत मुलाकडे पाठवले.

Eknath Shinde : आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; या शाळेची मान्यता रद्द, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here