लखीमपूर खीरी: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. शहराजवळ असणाऱ्या राजापूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या गोलू नावाच्या तरुणानं भररस्त्यात स्वत:ची दुचाकी पेटवली. वाहतूक पोलिसांनी चलान कापल्यानं संतप्त झालेल्या गोलूनं त्याच्या दुचाकीला आग लावली. पोलिसांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यानं केला.

मित्रासोबत औषध घेण्यासाठी दुकानात जात असताना चौकात वाहतूक पोलीस निरीक्षक हवालदारांसह वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी पोलिसांनी आपल्याला रोखल्याचं गोलूनं सांगितलं. चलान कापण्याची धमकी देऊन पोलिसांनी ५०० रुपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्यास इन्कार केल्यानं पोलिसांनी चलान फाडले, असा दावा गोलूनं केला.
पोटात चार कॅप्सूल, त्यात १ किलो सोनं; तस्काराला घेऊन पोलीस विमानतळावरून थेट रुग्णालयात
पोलिसांनी पावती फाडताच गोलू संतापला. त्यानं तिथेच दुचाकीला आग लावली. दुचाकीनं पेट घेतला. ती जळू लागली. दुचाकी जळताना पाहून अनेक जण जमले. प्रकरण वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. गोलूसोबत वाद झालेले पोलीस निघून गेले.
दूध पोळीवरून आईसोबत वाद; नाराज मुलानं आयुष्य संपवलं, पत्नीनंही टोकाचं पाऊल उचललं
आसपासच्या भागांमधील अनेक जण दुचाकी पेटत असलेल्या चौकात जमले. थोड्याच वेळात त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. एका दुचाकीवरून ३ जण प्रवास करत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मल जीत यांनी दिली. दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या तिघांनी हेल्मेट परिधान केलेलं नव्हतं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांची २ हजारांची पावती फाडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here