सोशल मीडियावर अश्लिल फोटो अपलोड करणाऱ्या लिव्ह इन पार्टनरला तरुणीनं मित्राच्या मदतीनं संपवल्याची घटना बंगळुरूत घडली. हत्या करण्यात आलेला तरुण पेशानं डॉक्टर असून आरोपी तरुणी वास्तुविशारद आहे. डॉक्टर विकास यांनी त्यांच्या लिव्ह इन पार्टनरचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

तरुणीनं तिच्या तीन मित्रांना घरी बोलावून बदला घेण्याची योजना आखली. तरुणीचे मित्र घरी आले आणि त्यांनी डॉक्टर विकास यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान आरोपी प्रेयसीनं फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दांड्यानं हल्ला केला. विकास बेशुद्ध पडले. त्यांना उपचारांसाठी जयश्री रुग्णालयात नेण्यात आलं.
प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी विकास यांना सेंट जॉन्स रुग्णालयात रेफर केलं. उपचार सुरू असताना विकास कोमात गेले. १४ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. विकास मूळचे चेन्नईचे रहिवासी होते. युक्रेनहून एमबीबीएस केलेल विकास एका खासगी रुग्णालयात काम करत होते. हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या तरुणीसोबत ते लिव्ह इनमध्ये राहत होते. दोघे लिव्ह इनमध्ये असल्याची कल्पना त्यांच्या कुटुंबियांना होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. बाकीचे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.