राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. ते जळगावात पोहोचताच आकाशवाणी चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गिरीश महाजन उपस्थित होते. मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कर्की येथील वीज उपकेंद्र शुभारंभ आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन शिंदे गटातील सर्व आमदार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांची तळमळ मी पाहिली आहे. दुःख वेदना सगुण मी रडायचं. ऐकणार कोणी नव्हत, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आमदार चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसे यांनी खूप त्रास दिला असे म्हणत चंद्रकांत पाटील यांच्या दुःख वेदना घेऊन ते माझ्याजवळ रडायचे..असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
आता राज्यातील राजकारणाची एकाधिकारशाही संपलेले असून हे घाणेरडे राजकारण तडीपार करण्याचा प्रयत्न करत या एकाधिकारशाहीला आमचा वाघ पुरून उरला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आधीचे एकनाथ तुमच्यामागे हात धुवून लागले होते. पण हा एकनाथ हातात हात घेवून तुम्हाला सोबत घेवून जाणार आहे. आपल्याला आता २०-२० चा सामना खेळायचा आहे. आपल्याला कमी षटकांमध्ये जास्त धावा आम्हाला काढायच्या आहेत, असे सांगत आमदारकी असणाऱ्या घराण्याला पराभूत करणारे आमचे चंद्रकांत पाटील आहेत. त्यांना गिरीशभाऊंची देखील मदत होतीच.