Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 21, 2022, 6:33 AM
Maharashtra Politics | दापोली शहर शाखेबाहेर असलेल्या रस्त्यावर ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रामदास कदम यांचा निषेध करणारे बॅनर व प्रतिकात्मक पुतळा घेऊन आले व त्यांनी रामदास कदम यांच्या विराधात घोषणा देण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच शिंदे गटाचे कार्यकर्ते शिवसेना शहर शाखेच्या बाहेर जमले, तेवढ्यात पोलिसही आले, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रामदास कदम व आ.भास्कर जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण काहीकाळ तंग झाले.

हायलाइट्स:
- कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली
- शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
- पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
दापोली शहर शाखेबाहेर असलेल्या रस्त्यावर ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रामदास कदम यांचा निषेध करणारे बॅनर व प्रतिकात्मक पुतळा घेऊन आले व त्यांनी रामदास कदम यांच्या विराधात घोषणा देण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच शिंदे गटाचे कार्यकर्ते शिवसेना शहर शाखेच्या बाहेर जमले, तेवढ्यात पोलिसही आले, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रामदास कदम व आ.भास्कर जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण काहीकाळ तंग झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून पुतळा ताब्यात घेतला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शहर शाखेत पाठविले तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेरच थांबवले. ठाकरे गटाचे कार्यकर्ते शाखेत जात असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखेत घुसले तर याच गडबडीत शाखेच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची काच कोणीतरी फोडली, त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याना बाहेर काढले, तेवढ्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकीरण काशीद तेथे उपस्थित झाले व त्यांनी दोन्ही गटाच्या पाच जणांनी पोलीस ठाण्यात येण्याची विनंती केली. तेव्हा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा आमच्या नावावर आहे ती बंद करा व सर्वांना बाहेर काढा अशी मागणी केली.
त्यानंतर दोन्ही गटाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात आले असून उपविभागीय अधिकारी शशिकीरण काशीद यांच्या उपस्थितीत दोन्ही गटांमध्ये चर्चा झाले. या सर्व प्रकारामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांशी झालेल्या चर्चेत दळवी गटाचे सूर्यकांत दळवी, तालुकाध्यक्ष ऋषिकेश गुजर, नरेंद्र करमरकर, किशोर देसाई तर एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम समर्थक प्रदीप सुर्वे, प्रसाद रेळेकर, उन्मेष राजे, रोहिणी दळवी, प्रीती शिर्के, राजेंद्र फणसे आदी उपस्थित होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.