‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घोटाळ्यातून आलेले बहिशेबी पैसे आपल्या कुटुंबीयांच्या नावे सुरू केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये वळवले. ठाकरे या चित्रपटाच्या प्रकल्पातही त्यांनी बेहिशेबी पैसे वळवले’,

 

sanjay-raut-2
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घोटाळ्यातून आलेले बहिशेबी पैसे आपल्या कुटुंबीयांच्या नावे सुरू केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये वळवले. ठाकरे या चित्रपटाच्या प्रकल्पातही त्यांनी बेहिशेबी पैसे वळवले’, असा दावा या प्रकरणात सक्तवसूली संचालनालयासाठी (ईडी) महत्त्वाची साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी जबाबात केला आहे.

पत्राचाळ घोटाळ्याबद्दलच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊत हे १ ऑगस्टपासून कोठडीत आहेत. ईडीने या प्रकरणात अलीकडेच पुरवणी आरोपपत्र दाखल करून राऊत यांना आरोपी दाखवले आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर आज, बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पुरवणी आरोपपत्रात पाटकरच्या जबाबाचा समावेश आहे.

‘राऊत यांनी राऊतर्स एंटरटेन्मेंट एलएलपी नावाची कंपनी स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी ठाकरे या चित्रपटाची निर्मिती केली. त्या प्रकल्पात त्यांनी आपले बेहिशेबी पैसे वळवले. एप्रिल-२०२१मध्ये मद्य व्यवसायाच्या एका कंपनीतही त्यांचे स्वारस्य होते. अलीकडच्या काळात कुटुंबीयांच्या नावे बनावट कंपन्या सुरू करूनही त्यात बेहिशेबी पैसे वळवणे त्यांनी सुरू केले होते’, असा दावा पाटकर यांनी जबाबात केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here