Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 21, 2022, 7:08 AM
Kalyan news | ‘तू माझ्या सोबत आली नाहीस तर, मी तुला जिवंत सोडणार नाही’. असे बोलून खिशातून ब्लेड काढून पत्नीच्या गळ्यावर, हातावर वार करण्यास सुरुवात केली. पत्नीने पतीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर ब्लेडने वार केले. ती बेशुध्द होऊन खाली पडली असता आरोपी पती समाधान याने पत्नीच्या अंगावर व डोळ्यात मिरची पूड टाकून पळून गेला.

हायलाइट्स:
- खडकापाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पोलिसांनी हल्लेखोर नवऱ्याला ठोकल्या बेड्या
समाधान हा व्यसनी असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून त्याची पत्नी ही तिच्या माहेरी शहाड येथे आली होती. सोमवारी रात्री आठ वाजता पती समाधान पत्नीला घरी नेण्यासाठी आला. त्यावेळी तिने आपण येणार नाही असे सांगितले. त्याचा राग समाधानला आल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी बहिणीला घडलेला प्रकार सांगत असतानाच ‘तू माझ्या सोबत आली नाहीस तर, मी तुला जिवंत सोडणार नाही’. असे बोलून खिशातून ब्लेड काढून पत्नीच्या गळ्यावर, हातावर वार करण्यास सुरुवात केली. पत्नीने पतीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर ब्लेडने वार केले. ती बेशुध्द होऊन खाली पडली असता आरोपी पती समाधान याने पत्नीच्या अंगावर व डोळ्यात मिरची पूड टाकून पळून गेला. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पत्नी न सांगता घराबाहेर गेल्याने डोकं फिरलं, हाताची बोटंच छाटली
गेल्याच महिन्यात बारामतीमध्ये पती-पत्नीमधील वाद विकापोला गेल्याचा प्रकार घडला होता. न सांगता घराबाहेर गेली या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीच्या हाताची बोटे कोयत्याने हल्ला करून तोडल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतील बयाजीनगर रुई येथे घडला. याबाबत जखमी दीपाली सुदर्शन जाधव यांनी फिर्याद दिली असून पती सुदर्शन रणजीत जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी दीपाली यांच्या डाव्या हाताची करंगळी व त्या शेजारील बोट तुटले आहे. तसेच, त्यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवरही गंभीर दुखापत झाली आहे. दीपाली यांच्यावर बारामतीत खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.