Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता, गोरेगावच्या नेस्को मैदानावर शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी सात वाजता हा मेळावा होणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांना जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. सरा मेळाव्यासाठी पालिकेने परवानगी नाकारल्यास पुढील रणनीती काय असेल, याबाबत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात, हेदेखील पाहावे लागेल.

 

Uddhav Thackeray Rally
उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळालेली नाही
  • मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार
  • रामदास कदम यांनी तर वैयक्तिक पातळीवर ठाकरे कुटुंबीयांवर अत्यंत बोचरी अशी टीका केली होती
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि शिंदे गटातील द्वंद्व उत्तरोत्तर तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होत आहे. गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेची ओळख असलेला दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, शिवसेनेला अद्याप शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीवर शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेणार, असा चंग बांधला असला तरी एकूण परिस्थिती पाहता दसरा मेळावा होईल की नाही, याबाबत अद्याप तरी साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यात काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा का महत्त्वाचा? शिवसेना दबाव का वाढवतेय?
शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरून शिंदे गटावर हल्ला चढवत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे अद्याप म्हणावे तसे लढाईत उतरले नसल्याचे दिसत होते. त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकणार का, हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अलीकडेच रामदास कदम यांनी तर वैयक्तिक पातळीवर ठाकरे कुटुंबीयांवर अत्यंत बोचरी अशी टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात या सगळ्याचा कशाप्रकारे समाचार घेणार, हे पाहावे लागेल. दसरा मेळाव्यासाठी पालिकेने परवानगी नाकारल्यास पुढील रणनीती काय असेल, याबाबत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात, हेदेखील पाहावे लागेल.
ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे आणि शिवसेना आमनेसामने, पोलीस वेळीच पोहोचले अन्यथा…
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी सात वाजता हा मेळावा होणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांना जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी केलेले आरोप उद्धव ठाकरे कशाप्रकारे परतावून लावतात, हे पाहावे लागेल. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये शिवसेनेला गळती लागली आहे. परिणामी उद्धव ठाकरेंसोबत असलेले शिवसैनिक काहीसे धास्तावले आहेत, चिंतेत आहेत. त्यामुळे आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकणार का, हे पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here