accident news today, भरधाव ट्रकने केला मोठा घात, फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं; चौघांनी गमावले प्राण – road accident today in delhi truck mowed down 4 people
नवी दिल्ली : अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशात दिल्लीतील सीमापुरी इथे मंगळवारी रात्री उशिरा एका अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना तुडवले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये दोन जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवार-बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास डीटीसी डेपोच्या रेडलाईटजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे.
ट्रकची चाकं अंगावर चढताच जखमींनी आरडाओरडा सुरू केल्याची माहिती आहे. यानंतर आजूबाजूचे लोक धावत आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता. तर चार जणांचे अतोनात हाल झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे आणखी दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर दोघांची प्रकृती पाहता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.