Kolhapur News : तरुणाने टोकाचे पाऊलत आपल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी धाव घेत तरुणाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. त्याने विषय प्यायले होते.

 

kolhapur news
‘गुडबाय लाइफ’ म्हणत कैलासने ऋतुजाला संपवलं, नंतर त्याने आणखी एक टोकाचं पाऊल उचललं…
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात मोठी घटना घडली आहे. या घाटात एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुण आणि तरुणी हे एकमेकांना ओळखत होते. तरुणीचा खून केल्यानंतर तरुणाने विष प्यायले होते. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

इचलकरंजीच्या खोतवाडीमधील तरुणी ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१ )हीचा कैलास आनंदा पाटील (वय २८) याने आधी खून केला. त्यानंतर त्याने विषय प्यायले. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ऋतुजा आणि कैलास हे दोघे नात्यातील होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता, अशी माहिती समोर आली आहे. ऋतुजा ही बी.एस.सीचे शिक्षण घेत होती. तर कैलास व्यवसाय करत होता. माझा गावात मोठा फोटो लावा असं मित्रांना सांगत कैलास कोल्हापूरला निघाला होता. मी आज आपलं जीवन संपवणार आहे, असं तो मित्रांना बोलला होता. त्याने ‘गुडबाय लाइफ’ हे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते.

लग्नाला होत असल्याने कैलास नाराज होता. त्याने ऋतुजला मंगळवारी भेटायला बोलवले. तिला कारमध्ये बसवून तो गिरोली घाट परिसरात गेला. तिथे जाऊन त्याने आधी ऋतुजाचा खून केला. तिचा खून केल्यानेतर त्याने नातेवाईकांच्या व्हॉट्सग्रुपवर मेसेज टाकला. ‘गुडबाय’ असं लिहून त्याने विष प्यायले. व्हॉट्सअॅपग्रुपवरील मेसेज पाहून कुटुंबीय हादरले. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दोघांचे मोबाइल लोकेश तपासल्यावर ते गिरोली घाट परिसरात असल्याचे समोर आले. यानंतर पेठवडगाव आणि कोडोलीच्या पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर कैलासला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here