मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही, याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.

१२ वर्षांनंतर राजू श्रीवास्तव यांना मिळालं होतं खरं प्रेम, शिखासाठी करावा लागला संघर्ष

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची फटकेबाजी

मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली होती. अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मागणी केली. उद्धव साहेबांनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी. यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी. राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळावेत, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

Dasra Melava: दसरा मेळाव्याला पालिकेने परवानगी न दिल्याने शिवसेना अखेर हायकोर्टात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here