नवी दिल्ली: भारतात स्टँड अप कॉमेडीचा फॉर्मेट रुजवणाऱ्या प्रसिद्ध विनोदवीरांपैकी एक असलेल्या राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर जवळपास गेल्या ४० दिवसांपासून उपचार सुरु होते. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी हरप्रकारे प्रयत्न केले. मात्र, राजू श्रीवास्तव यांची मृ्त्यूशी सुरु असलेली झुंज अपेशी ठरली.

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आज ना उद्या बरी होईल, अशी आशा त्यांच्या कुटुंबीयांना होती. त्यासाठी कुटुंबीयांनी हरप्रकारे प्रयत्न केले. रुग्णालयात असताना राजू श्रीवास्तव यांच्या भावाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. दीपू श्रीवास्तव यांनी राजू यांना त्यांच्या विनोदांच्या जुन्या रेकॉर्डिंग ऐकवल्या होत्या. माझ्या भावाची प्रकृती खूपच हळूहळू सुधारत होती. त्याची प्रकृती वेगाने सुधारावी, यासाठी आम्ही त्याला जुने ऑडिओ मेसेज ऐकवले. एवढेच नव्हे राजू श्रीवास्तव यांना त्यांच्याच परफॉर्मन्सच्या जुन्या क्लीप ऐकवण्यात आल्या. यामध्ये राजू श्रीवास्तव यांच्या लोकप्रिय गजोधर आणि संकठा या पात्रांच्या विनोदांचा समावेश होता, अशी माहिती दीपू श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.

१९८८ मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजू श्रीवास्तव सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमात दिसले होते. मात्र, चित्रपटसृष्टीत फारसे यश न मिळाल्यामुळे राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा स्टँड अप कॉमेडीकडे वळवला होता. राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महामुकाबला यांसारख्या शोमधून ओळख मिळाली. ते ‘बिग बॉस ३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या शोमध्येही दिसले होते.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन, ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अमिताभ बच्चन यांचा मेसेज

राजू श्रीवास्तव रुग्णालयात असताना त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली होती. यामध्ये बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी खास ऑडिओ संदेश पाठवला होता. राजू आता ऊठ, खूप झालं, अजून तुला खूप काम करायचे आहे. आता ऊठ. आम्हा सर्वांना हसायला शिकव, असे अमिताभ बच्चन यांनी त्या संदेशात म्हटले होते.
दारुच्या नशेत कपिल… जेव्हा राजू श्रीवास्तव यांनी केला होता मोठा खुलासा
राजू श्रीवास्तव यांच्या हृदयात १०० टक्के ब्लॉकेज

राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. काल राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते. त्यांच्यावर तब्बल ४० दिवस एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सुधारावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here