versova bandra sea link | आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत गेले आहेत. जाहीरपणे ते आठव्यांदा तर लपुनछपून ते १२ व्या वेळी दिल्लीत गेले आहेत. याठिकाणी ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी गेले असतील, असे गृहीत धरुया. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का गेला, यावर सरकारने अद्याप अधिकृत उत्तर दिलेले नाही. केवळ आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

हायलाइट्स:
- २५ सप्टेंबरला चेन्नईत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत
- महाराष्ट्रातील मुलांना या मुलाखतींना जायचे असेल तर राज्य सरकार त्यांचे तिकीट काढून देणार का
हा महाराष्ट्रातील तरुण-तरुणींचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा आणि राज्याला आर्थिक स्तरावर एकटे पाडण्याचा डाव आहे. या प्रकल्पाचे काम मुंबईत असेल तर भूमिपूत्रांना संधी का देण्यात आली नाही. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने सुरु आहेत. तसं नसेल तर त्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचे या सगळ्या कारभाराकडे लक्षच नाही. येत्या २५ सप्टेंबरला चेन्नईत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. मग आता महाराष्ट्रातील मुलांना या मुलाखतींना जायचे असेल तर राज्य सरकार त्यांचे तिकीट काढून देणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
वेदांता-फॉक्सकॉनवरुन प्रश्न विचारले तर चौकशी करण्याची धमकी दिली जाते: आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत गेले आहेत. जाहीरपणे ते आठव्यांदा तर लपुनछपून ते १२ व्या वेळी दिल्लीत गेले आहेत. याठिकाणी ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी गेले असतील, असे गृहीत धरुया. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का गेला, यावर सरकारने अद्याप अधिकृत उत्तर दिलेले नाही. केवळ आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याबद्दल प्रश्न विचारले तर चौकशीच्या धमक्या दिल्या जातात. रायगडमधील बल्क ड्रग प्रकल्पही राज्याबाहेर जात आहे. या प्रकल्पामुळे राज्यात ७० ते ८० हजार रोजगार उपलब्ध झाले असते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आमच्या आधीच्या पत्रकारपरिषदेनंतर खोके सरकाने एमआयडीसी परिसरातील प्रकल्पांकडे पुन्हा लक्ष वळवले आहे. या प्रकल्पांसाठीच्या भूखंड वाटपाला स्थगिती दिली होती. ती आता उठवण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.