ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोठ्या भावानं लहान भावाला बेदम मारलं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ लहान भावाला अनेकदा अभ्यासावरून, पैशाच्या अपव्ययावरून ओरडायचा. मात्र लहान भाऊ त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा. त्यामुळे संतापलेल्या मोठ्या भावानं लहान भावाला मारलं. त्यात त्याचा मृत्यू झाला.

 

boy died
भुवनेश्वर: ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोठ्या भावानं लहान भावाला बेदम मारलं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ लहान भावाला अनेकदा अभ्यासावरून, पैशाच्या अपव्ययावरून ओरडायचा. मात्र लहान भाऊ त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा. त्यामुळे संतापलेल्या मोठ्या भावानं लहान भावाला मारलं. त्यात त्याचा मृत्यू झाला.

राज मोहन सेनापती असं लहान भावाचं नाव आहे. त्याचा मोठा भाऊ बिस्वा मोहन एमबीए ग्रॅज्युएट आहे. बिस्वाच्या मारहाणीत राजचा मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आली. दोघे भाऊ नयागढमधील इटामतीचे रहिवासी होते. बऱ्याच कालावधीपासून ते राजधानी भुवनेश्वरमध्ये राहून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते.
डॉक्टरनं इन्स्टाग्रामवर टाकले लिव्ह इन पार्टनरचे न्यूड फोटो; गर्लफ्रेंडनं घेतला भयंकर बदला
डीसीपी प्रतिक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिस्वा मोहन बँकिंग तज्ज्ञ अधिकारी पदासाठी आवश्यक असलेली मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला. तर लहान भाऊ राज मोहन बी. एड करता करता स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता. मात्र अभ्यासाच्या बाबतीत तो फारसा गंभीर नव्हता. त्याला कोणतीच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता आलं नाही. त्यावरून मोठा भाऊ वारंवार त्याला ऐकवायचा. अभ्यास करण्याचा आग्रह धरायचा. घरातून पाठवले जाणाऱ्या अनावश्यक ठिकाणी खर्च करू नको, असं बिस्वा सतत राजला सतत सांगायचा.
वसई बीचवर सापडलेली सूटकेस; थरकाप उडवणारी मर्डर मिस्ट्री, १३ महिन्यांनी गूढ उकललं
नुकतीच राज मोहननं एक स्पर्धा परीक्षा दिली होती. त्यात तो अनुत्तीर्ण झाला. यावरून दोन भावांमध्ये भांडण झालं. वाद इतका वाढला की बिस्वानं राजला मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे राज बेशुद्ध पडला. त्याला कॅपिटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्या प्रकरणात आरोपी बिस्वा मोहनला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. राज मोहनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here