राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मासिक पांचजन्यमध्ये काम करणाऱ्या निशांत आझाद यांना धमकी मिळाली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. एका व्हर्च्युअल नंबरवरून ‘सर तन से जुदा’ धमकी मिळाल्याची तक्रार आझाद यांनी पोलिसांत दाखल केली होती. आझाद यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

निशांत यांनी पुन्हा एकदा धमकी देणाऱ्याला त्याची ओळख विचारली. त्यावर ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन जे जुदा! सर तन से जुदा!,’ असं उत्तर समोरील व्यक्तीनं चॅटवर दिलं. या प्रकरणी निशांत आझाद यांनी गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांच्या सायबर आणि सर्व्हिलान्स पथकानं तपास सुरू केला. मेसेजनंतर अनेकदा त्याच नंबरवरून कॉल आणि व्हिडीओ कॉल आले. मात्र मी त्यांना उत्तर दिलं नाही, असं निशांत यांनी सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि निशांत एकमेकांना दीड वर्षांपासून ओळखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निशांत यांनी आरोपी प्राणप्रिय वत्सला दीड लाख रुपये उधार दिले होते. ते पैसे निशांत यांनी परत मागितले. निशांत वारंवार पैसे परत करण्यास सांगत असल्यानं त्यांना घाबरवण्यासाठी आणि त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी प्राणप्रियनं त्याला धमकी दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.