नवी दिल्ली : भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे कर्मचारी मूनलाइटिंग करताना आढळले असून, त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी विप्रो कंपनीत काम करत असताना प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम करताना आढळून आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे कंपनी कठोर कारवाई करत आहे. कंपनीच्या या कठोर कारवाईमुळे आता मात्र ३०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे.

कर्मचाऱ्यांना ‘सेकंड जॉब’साठी मुभा; फूड डिलिव्हरी कंपनीची अनोखी ऑफर, फक्त ‘या’ अटी
विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी बुधवारी सांगितले की, कंपनी ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. हे सर्व कर्मचारी मूनलाइटिंग करताना आढळून आले आहेत. ते म्हणाले की, हे कर्मचारी विप्रोमध्ये असताना इतर कंपन्यांसाठी काम करत होते. ऋषद प्रेमजी म्हणाले की, हे नियमांचे उल्लंघन असून आम्ही त्यांना काढून टाकले आहेत.

मूनलाइटिंगबाबत एकीकडे मतभेत होत असताना अनेकांनी कठोर भूमिका घेतली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इन्फोसिसने दुहेरी रोजगार किंवा ‘मूनलाइटिंग’ ला परवानगी नाही असे प्रतिपादन करून आपल्या कर्मचार्‍यांना एक मजबूत संदेश पाठवला आणि चेतावणी देत म्हटले की कराराच्या कलमांचे कोणतेही उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल “ज्यामुळे रोजगार संपुष्टात येऊ शकतो”.

आता गुपचूप काम करणे महागात पडेल, दिग्गज IT कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला इशारा
ऋषद प्रेमजी यांनी बुधवारी असेही म्हटले की मूनलाइटिंगवरील त्यांच्या टिप्पण्यांसाठी त्यांना टीकेचा सामना करावा लागला असेल, पण तरीही ते या विषयावर त्यांच्या मतांवर ठाम आहेत. ऋषद प्रेमजी यांनी सर्वप्रथम मूनलाइटिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. भारतातील विप्रो, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्या मूनलाइटिंगच्या विरोधात आहेत. विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष म्हणाले की, मूनलाइटिंगची व्याख्या पाहिली तर ती इतर कामे गुप्तपणे करणे आहे. ते म्हणाले की, विप्रोमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी X, Y किंवा Z साठी काम करणाऱ्यांसाठी कोणाला जागा नाही. विप्रोमध्ये काम करणारे कर्मचारी इतर कंपन्यांसाठी काम करू शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. हे पूर्णपणे नियमांचे उल्लंघन आहे आणि ते स्पष्ट आहे.

मूनलायटिंग म्हणजे काय; नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घ्या काय सांगतात नियम
मूनलाइटिंग म्हणजे काय?
मूनलाइटिंग म्हणजे एका कंपनीत काम करताना दुसऱ्या कंपनीत काम करणे. सोप्प्याभाषेत बोलायचे तर जेव्हा एखादा कामगार त्याच्या नेहमीच्या कामापेक्षा इतर कोणासाठीही काम करतो तेव्हा त्याला मूनलाइटिंग म्हणतात. आयटी क्षेत्रासह इतर नोकऱ्यांच्या क्षेत्रात कर्मचारी आपले उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने इतर कंपन्या किंवा प्रकल्पांसाठी काम करतात. कंपन्यांच्या मते हे इंटिग्रिटी व्हायोलेशन (अखंडतेचे उल्लंघन) आहे. त्याचवेळी, बरेच लोक याला फ्रीलान्सिंग देखील म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here