रेडइट वापरकर्त्यानं सांगितला किस्सा
एक दिवस मी माझ्या मैत्रिणीला घेऊन निघालो होतो. तिला एका ठिकाणी सोडायचं होतं. मी सोनी सिग्नलजवळ पोहोचलो आणि प्रचंड वाहतूककोंडीत अडकलो. त्यापुढे एजीपुरा उड्डाणपुलाचं काम सुरू होतं. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. आम्हाला खूप भूक लागली होती. त्यामुळे आम्ही रस्ता बदलला. एका हॉटेलमध्ये डिनरला गेलो. ते आमचं पहिलं रोमँटिक डिनर ठरलं. ज्या तरुणीसोबत डिनरला गेलो होतो, तिच्याशी माझी छान मैत्री झाली. त्या दिवसापासून आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. जवळपास ३ वर्षे तिला डेट केल्यावर मी त्या तरुणीशी लग्नही केलं, असा किस्सा रेडइट वापरकर्त्यानं सांगितला आहे.
आमच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आम्ही ज्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूककोंडीत अडकलो, त्या उड्डाणापुलाचं काम अद्याप सुरुच आहे, असं वापरकर्त्यानं त्याच्या पोस्टच्या शेवटी नमूद केलं आहे. या पोस्टला आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी वाहतूककोंडीतील त्यांचे अनुभवदेखील शेअर केले आहेत.
traffic jam, ट्रॅफिक जॅमने बना दी जोडी! वाहतूककोंडीत दोघांचं प्रेम जमलं, लग्नही झालं; धमाल किस्सा वाचाच – man fell in love and got married, all thanks to bengaluru traffic
बंगळुरू: देशातील महानगरांमध्ये वाहतूककोंडीची समस्या नित्याची बाब झाली आहे. अनेकदा वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ दुपटीनं, तिपटीनं वाढतो. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये कित्येक तास वाहतूककोंडीत जातात. वाहतूककोंडीमुळे चालक, प्रवासी त्रस्त होतात. मात्र याच वाहतूककोंडीमुळे एका व्यक्तीचं आयुष्य बदललं आहे.