केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निवीर’ सैन्य भरतीसाठी वडजाई येथील तरुण मंगळवारी रात्री चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास हे सर्वजण कल्याण येथे पोहोचले. तेथून हे तरुण मुंब्रा येथे ‘अग्निवीर’च्या भरतीसाठी जाणार होते. मात्र, रामेश्वर भरत देवरे याला मळमळ होऊ लागल्याने, तो उलटी करण्यासाठी रेल्वे रुळांकडे गेला. वाकून उलटी करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वरचा अपघाती मृत्यू झाल्यानेत त्याच्यासोबत असलेले मित्र घाबरले होते.
रामेश्वर देवरेने कॉम्प्युटर डिप्लोमा केला होता. रिकाम्या वेळेत तो वडिलांना शेतातील कामासाठी मदत करायचा. शेतात पिकवलेला भाजीपाला स्वतः विक्री करून तो आई-वडिलांना मदत करत होता. नोकरीच्या अपेक्षेने दिवस-रात्र मेहनतही करत होता. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल, असे वडील सांगत असल्यामुळे त्याने सैन्यात जाण्याची तयारी केली होती. मात्र, देशसेवा करण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तो वडजाईचे उपसरपंच संजय महाराज देवरे यांचा पुतण्या होता.
Home Maharashtra youth died accident, उलटी करण्यासाठी रुळांकडे गेला, ट्रेनची धडक; धुळ्यातील तरुणाचं अग्निवीर...
youth died accident, उलटी करण्यासाठी रुळांकडे गेला, ट्रेनची धडक; धुळ्यातील तरुणाचं अग्निवीर होण्याचं स्वप्न अधुरं – youth going for agneepath recruitment died after train hits him at mumbra railway station
धुळे: ‘अग्निवीर’च्या भरतीसाठी मुंबईत जाणाऱ्या धुळ्यातील वडजाई येथील तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११च्या सुमारास ठाणे येथील मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडली आहे.