मुंबई : “आज एवढी गर्दी आहे… दसऱ्याला किती गर्दी असेल… किती पटीत असेल… दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच होणार”, असा विश्वास करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात केली. मंचावर संजय राऊत यांच्यासाठी ठेवलेली खुर्ची पाहून उद्धव ठाकरे यांनी राऊतांची आठवण काढली तसेच त्यांच्या झुंजारपणाचं कौतुक केलं. “आज संजय राऊत यांच्यासाठी आपण खुर्ची ठेवली आहे. कारण उद्या राऊत मिंधे गटात गेले की काय, अशी चर्चा सुरु होईल. पण माझा संजय मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. तलवार हातात घेऊन लढाईमध्ये पुढे आहेत”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राऊतांचं लढाऊ बाण्याचं कौतुक केलं.

शिवसेनेचा दसरा मेळावा तोंडावर आला आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे दसरा मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी आज गोरेगाव येथून शिवसेनेचा शंखनाद घुमला. गोरेगावच्या नेस्को संकुलात गटप्रमुखांचा विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. आज त्यांनी खरोखर दसरा मेळाव्याआधीचा ट्रेलर दाखवला. नरेंद्र मोदी-अमित शाह- एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला.

शिवसेना नेत्यांना बसण्यासाठी मंचावर खास खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. लीलाधर डाके, अनंत गीते, भास्कर जाधव, अरविंद सावंत यांच्याबरोबरच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती. राऊत तुरुंगात असले तरी त्यांच्या नावाची खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली होती. याच घटनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीची २ मिनिटे संजय राऊतांच्या लढाऊपणाचं कौतुक करुन कृतार्थभाव व्यक्त केला.

संजय राऊत तलवार हातात घेऊन आपल्यासोबत लढतोय!

“आज संजय राऊत यांच्यासाठी आपण खुर्ची ठेवली आहे. कारण उद्या राऊत मिंधे गटात गेले की काय, अशी चर्चा सुरु होईल. पण माझा संजय मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. तलवार हातात घेऊन लढाईमध्ये पुढे आहेत. जे मोठे झाले ते आज आपल्याला सोडून निघून गेलेत. पण ज्यांनी मोठं केलं ते तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात… मला कोणतीही चिंता नाही. संजय राऊत तर तलवार हातात घेऊन लढतोय. मिंधे गटात तो गेला नाही. त्याचा स्वभावच मोडेन पण वाकणार नाही असा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जमीन दाखवा म्हणणाऱ्या शाहांना अस्मान दाखवा, उद्धव ठाकरेंची डरकाळी
मुलं पळवणारी टोळी ऐकलेय, बाप पळवणारी औलाद पण आलेय

मुलं पळवणारी टोळी ऐकलेय, बाप पळवणारी औलाद पण आलेय. त्यामुळे मंचावर आल्यावर पहिल्यांदा बाळासाहेबांचा फोटो पाहिला. गद्दारांना सत्तेचं दूध पाजलं पण ते आता तोंडाची गटारं उघडतायेत. मुंबईवर लचके तोडणाऱ्या गिधाडांची औलाद आली आहे. निजामशाह, आदिलशाह त्या कुळातील आताचे शाह, देशाचे गृहमंत्री… मुंबईत येऊन काय म्हणाले- ठाकरेंना जमीन दाखवा… मी शिवसैनिकांना आवाहन करतोय, त्यांना तुम्ही अस्मान दाखवा. ही नुसती गवताची नाही तलवारीची पातीही आहे. मुंबई तुमच्यासाठी स्क्वेअर फुटातील जमीन असेल, आमची ही मातृभूमी आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या मुंबई मिशनचा समाचार घेतला.

तुमच्या चेल्या चपाट्यांना मुंबई महापालिका, विधानसभा निवडणुका घ्यायला सांगा, उद्धव ठाकरेंचं शाहांना आव्हान
पुन्हा सांगतोय २५ वर्ष युतीत सडली

ही मुंबादेवी आहे, जो आमच्यावर वार करायला येईल, त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या वडापावचा ठेचा जास्त झाला का, की इतके लांब ढोकळा खायला गेलात.पुन्हा दसरा येतोच आहे, जी काढायची ती लक्तरं काढणारच आहे. पण आज मुद्दाम मुंबईवर बोलणार आहे कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई पहिल्यांदा बोललो, हा शब्द बाळासाहेबांनी दिलाय, ही तीच शिवसेना. पुन्हा मुंबईवर हक्क सांगण्याचं धाडस करु नका. वंशवादावरुन टीका होते, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ कुठे होता. आज मी पुन्हा सांगतोय २५ वर्ष युतीत सडली, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केली.

​​​देवेंद्र फडणवीसांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, उद्धव ठाकरेंचा थेट नाव घेऊन निशाणा
शिवसेनेच्या वाट्याला येऊ नका, कोथळा बाहेर काढू

शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करु नका. सेना म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळ नाही. रक्तपात झाला तर आपल्यात आणि गद्दारात होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाई शाबूत राहील.गद्दार असलेल्यांपेक्षा मुठभर निष्ठावान असलेले बरे. आपल्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक समजून लढा. विजय आपलाच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here