तरुणीनं जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची कागदपत्रं सुशील कुमारकडे होती. दोघांमध्ये तिसरा आल्यावर नात्यात तणाव निर्माण झाला आणि तरुणीनं सुशील कुमारकडे जमिनीची कागदपत्रं मागण्यास सुरुवात केली, अशी माहिती लखनऊ पश्चिम विभागाचे डीसीपी शिवासिंपी चिनप्पा यांनी दिली.
दोघांमध्ये वाद टोकाला गेले. सुशीलनं प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. जमिनीचे कागजपत्रं नेण्यासाठी सुशीलनं प्रेयसीला १२ सप्टेंबरला केसरबाग येथील हॉटेलात बोलावलं. तिथे दोघांचं भांडण झालं. सुशीलनं तिथे तरुणीवर बलात्कार केला आणि मग तिची हत्या केली. ही हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न सुशीलनं केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी रात्रभर हॉटेलमध्ये थांबला आणि सकाळ होताच हॉटेलमधून फरार झाला. हॉटेलच्या सर्व्हिस स्टाफनं सकाळी दार ठोठावलं. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्टाफला संशय आला. त्यानं मास्टर कीनं दार उघडलं. त्यावेळी बाथटबमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणीचा मृत्यू गळा आवळल्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं.