आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पश्चिम येथे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता शिवसेनेने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली

अशी आहे मतांची गोळाबेरीज
सन २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेता रमेश लटके यांना ६२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. जवळपास १७ हजार मतांनी लटके यांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीत अपक्ष मुरजी पटेल यांनी ४५ हजार मते मिळवली होती. तर काँग्रेसच्या उमेदवाराला २७ हजार मते प्राप्त झाली होती. मुरजी पटेल हे मूळचे काँग्रेसवासी आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पारड्यातील २७ हजार मते आपल्या पारड्यात पडण्यासाठी ते प्रयत्न करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची २७ हजार मते शिवसेनेच्या पारड्यात पडावीत, यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.