jyotiba temple kolhapur, नवरात्रोत्सवाच्या तोंडावर जोतिबा डोंगरावर हे काय घडलं, सलग ३ वर्ष तोच प्रकार! नागरिकांमध्ये भीती – on the eve of navratri festival the main road of kolhapur jotiba mountain is once again blocked
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये ऐन नवरात्री उत्सवाच्या तोंडावर ज्योतिबाच्या डोंगरावर पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्योतिबा डोंगराचा मुख्य रस्ता पुन्हा एकदा खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सण-उत्सवात डोंगरावर मोठ्या प्रणामात गर्दी होती. पण आता मुख्य रस्ताच खचल्याने भाविकांची परवड होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर खूप खोल आणि रुंद भेगा पडल्यामुळे नागरिकांमध्ये कोणत्याही क्षणी रस्ता तुटून जाण्याची भीती आहे. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून नवीन पद्धतीने हा रस्ता बांधण्यात आला. पण तरीदेखील सलग तीन वर्ष हा रस्ता खचत असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. Weather Alert : महाराष्ट्रावर पुढचे ३-४ दिवस अस्मानी संकट, ‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्ट खबरदारी म्हणून या रस्त्याची वाहतूक आत्तापासूनच बंद करण्यात आली आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गायमुख मार्गाने ज्योतिबा डोंगरावर भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. नवरात्रीत खूप मोठ्या संख्येने भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असतात. पण अशात दरवर्षी रस्ता खचत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
वारंवार रस्त्याचं काम करूनही अशा पद्धतीने भेगा का पडत आहेत. यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे तर ज्योतिबाला जाण्यासाठी एक चांगला रस्ता हवाच अशी मागणीही भाविकांकडून करण्यात येत आहे.