मुंबई: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करत देशातील नागरिकांना पुन्हा धक्का दिला. फेडरल बँकेच्या निर्णयाचा परिणामे जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारावरही यापासून वेगळा नाही. गुरुवारी सकाळी भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२९ अंकांनी तर निफ्टीने १०८ अंकांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली आहे.

US फेडरल रिझर्व्हचा दे धक्का, व्याजदरात विक्रमी वाढ, भारतासह जगभरातील जनतेला बसणार झळ
आजच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो, एफएमसीजी मेटल मीडिया, सेक्टर्स वगळता सर्व सेक्टर्समध्ये विक्री होत आहे. बाजारात घसरण झाली असली तरी स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे बँकिंग, आयटी, तेल आणि वायू क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टीच्या ५० समभागांपैकी फक्त १९ समभागांनी सकाळी सहकारात्मक व्यवहार केली आहे, तर ३१ समभागांमध्ये घसरण होत आहे. सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी फक्त ११ समभाग हिरव्या चिन्हात उघडले आणि १९ समभाग लाल चिन्हात उघडले आहे.

US फेड देणार आनंदाची बातमी? अमेरिकेतील वाढत्या व्याजदराचा भारतीयांच्या खिशावर काय परिणाम होतो
आजच्या सत्रात वाढलेल्या समभागांवर नजर टाकली तर आयटीसी ०.८६ टक्के, मारुती सुझुकी ०.५५ टक्के, बजाज फायनान्स ०.५४ टक्के, एचयूएल ०.४१ टक्के, एनटीपीसी ०.२४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.१३ टक्के, इंडसइंड बँक ०.०७ टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, घसरलेल्या समभागांमध्ये एचडीएफसी १.५९ टक्के, टेक महिंद्रा १.३४ टक्के, विप्रो १.३० टक्के, बजाज फिनसर्व्ह १.२२ टक्के, एचसीएल टेक १.०३ टक्के, एचडीएफसी बँक ०.९५ टक्के, इन्फोसिसमध्ये ०.८८ टक्क्यांच्या घसरणीने व्यवसायाची सुरुवात झाली.

जागतिक मंदीचे संकट; जागतिक बँकेचा इशारा, मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक दरवाढीचा परिणाम
अमेरिकी स्टॉक मार्केट क्रॅश
फेड रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढवताच, तिन्ही शेअर बाजारांवर मोठी घसरण दिसल्याने गुंतवणूकदारांची विक्री सुरू होताच आधीच दबावाखाली असलेल्या अमेरिकन शेअर बाजार गडगडला. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात डाऊ जोन्स १.७% खाली बंद झाला, तर S&P ५०० १.७१% च्या तोट्यात राहिला. Nasdaq Composite मध्ये देखील १.७९% ची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेने सलग तिसऱ्यांदा व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढवल्यानंतर वॉल स्ट्रीटमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here