parbhani crime news, लग्नाचं स्वप्न दाखवून १० वर्षे महिलेवर केले अत्याचार, अखेर नराधमाने काय केलं पाहा… – a woman was tortured for 10 years by showing her dream of marriage
परभणी : लग्नाचं अमिष दाखवून एका ४४ वर्षीय महिलेवर सतत दहा वर्ष अत्याचार केल्याची घटना परभणी शहरातील हाजी हमीद कॉलनी भागात घडली आहे. आरोपीने सदरील प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख सलीम शेख सादेक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. नवरात्रोत्सवाच्या तोंडावर जोतिबा डोंगरावर हे काय घडलं, सलग ३ वर्ष तोच प्रकार! नागरिकांमध्ये भीती याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील हाजी हमीद कॉलनी भागात राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेला आरोपी शेख सलीम शेख सादेक याने लग्नाचे अमिष दाखवून महिलेचे दहा वर्षापासून शोषण केले. पीडित महिलेने घडलेला प्रकार कोणाला सांगू नये यासाठी आरोपी शेख सलीम शेख सादेक यांनी महिलेला थापडबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
वारंवार होत असलेल्या मारहाणीला आणि अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित महिलेने अखेर कोतवाली पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख सलीम शेख सादेक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर तुरनर करत आहेत. तर या अगोदर एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवून सतत बारा वर्षे अत्याचार केल्याची घटना परभणीमध्ये घडली होती. त्यात आता हा दुसरा प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.