Maharashtra Politics | गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक ठरली पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना चेतवले होते. या टीकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. शेवटी जे नशिबात लिहलेलं असतं, तेच होतं.

 

Uddhav Devendra battle
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका
  • देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
  • उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना चेतवले होते
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेले भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धव ठाकरे हे भाजपने आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करतात. पण २०१९ साली उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थानप केली तेव्हा त्यांनीदेखील आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता. आता उद्धव ठाकरे एका महिन्यात मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या, असे आव्हान देतात. पण उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवून नंतर आमची साथ सोडली तेव्हा त्यांनी राजीनामा का दिला नाही? त्यावेळी सर्व आमदारांचे राजीनामे घेऊन निवडणुका का घेतल्या नाहीत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
देवेंद्र फडणवीसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं? शिवसेनेनं तिरकस शब्दांत चढवला हल्ला
गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक ठरली पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना चेतवले होते. या टीकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. शेवटी जे नशिबात लिहलेलं असतं, तेच होतं. तुम्ही २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही तिघांनी मला संपवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत, पण ते यशस्वी झाले नाहीत. भविष्यात देखील तुम्ही मला संपवू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
​​​देवेंद्र फडणवीसांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, उद्धव ठाकरेंचा थेट नाव घेऊन निशाणा
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, होय, तुमच्या आयुष्यातील ही शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचाराल आपलं काय, तर मी म्हणेन, की आपल्या आयुष्यातील ही पहिलीची निवडणूक आहे असं समजून लढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ‘ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा’ असं आव्हान फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केलं होतं, त्यावरुनच ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here