नांदेड : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनीचे एमएमएस लीक प्रकरण आणि मुंबईच्या पवई आयआयटीमध्ये महिलांच्या बाथरूममद्धे डोकावून पाहण्याचा प्रकार ताजं असतानाच नांदेडमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिम्नॅस्टिक क्लासला आलेल्या एका पंधरा वर्षीय विद्यार्थीनीला कपडे बदलताना पाहून तिच्याशी जवळीक साधणाऱ्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. या घटनेमुळे शहरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनीचे खासगी व्हिडिओ व मुंबईतील पवई आयआयटीमध्ये बाथरूमला गेलेल्या एका विद्यार्थिनीला डोकावून पाहणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. या घटनेने देशभरात खळबळ उडालेली असतानाच नांदेडमध्येही असा हिडीस व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

खळबळजनक! सुपारीचा खर्रा तोंडात टाकला अन् क्षणात होत्याचं नव्हतं, काळजात धडकी भरवणारी घटना
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी शाळेजवळ क्रीडा प्रशिक्षक जयपाल रेड्डी, वय ४० हा जिम्नॅस्टिक असोसिएशन क्लास चालवतो. त्याच्याकडे विद्यार्थी, विद्यार्थिनी जिम्नॅस्टिक या विविध क्रीडा प्रकारासाठी प्रशिक्षण घेतात. क्लासला शहरातील एक पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी जिम्नॅस्टिक क्लासला नियमितपणे येत होती. या विद्यार्थिनीसोबत हा क्रीडा प्रशिक्षक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. समाजात बदनामी होईल या भितीपोटी ती हा प्रकार निमूटपणे सहन करत होती. एवढ्यावरच हा प्रशिक्षक न थांबता त्याने मोबाईलवर अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून तिला त्रास द्यायला सुरुवात केली तसेच क्लासच्या चेंजिंग रूममध्ये ती कपडे बदलत असताना पाहून तिचा विनयभंग केला.

अखेर हा त्रास तिला सहन न झाल्याने घडलेला प्रकार तिने आपल्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. पीडित मुलीला सोबत घेऊन नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. २० सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेली फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी क्रीडा प्रशिक्षक जयपाल रेड्डी, वय ४० याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.

लग्नाचं स्वप्न दाखवून १० वर्षे महिलेवर केले अत्याचार, अखेर नराधमाने काय केलं पाहा…
सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस फौजदार ए. एस. पवार या तपास करत आहेत. चंदीगड, मुंबईनंतर नांदेडमध्ये असा प्रकार घडल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here