पुतीन लवकरच एक व्यापक कॉल-अपची घोषणा करू शकतात. त्यामुळे युद्धाला तोंड फुटू शकतं. रशियाच्या सीमा बंद केल्या जाऊ शकतात. त्यामुळेच रशियन नागरिक देश सोडून जाऊ लागले आहेत. पुतीन यांनी राखीव सैनिकांच्या तैनातीचा आदेश दिल्यानं लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. देशातली परिस्थिती बिघडत चालली आहे. काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, तर अनेक जण देश सोडून जाण्याची तयारी करत आहेत. रशियन एअरलाईन्सनं १८ ते ६५ वर्षे वयोगटात मोडणाऱ्या व्यक्तींना तिकीट विकण्यास नकार दिला आहे.
पुतीन यांच्या घोषणेमुळे युक्रेनच नव्हे, पोलंड, रोमानिया, मॉल्डोवा, स्वीडन, फिनलँडसारख्या देशांची चिंता वाढवली आहे. रशिया-युक्रेन युद्धात या देशांनी उघडपणे युक्रेनचं समर्थन केलं होतं. रशियाच्या इशाऱ्यानंतरही स्वीडन, फिनलँडनं नाटोच्या सदस्यत्वासाठी पावलं उचलली. त्यामुळे हे देश पुतीन यांच्या रडारवर आहेत.
Home Maharashtra vladimir putin, पुतीन यांच्या घोषणेनं रशियात खळबळ; नागरिक देश सोडण्याच्या तयारीत, फ्लाईट्स...
vladimir putin, पुतीन यांच्या घोषणेनं रशियात खळबळ; नागरिक देश सोडण्याच्या तयारीत, फ्लाईट्स फुल्ल – flight prices out of russia surge as putin calls up reservists for ukraine war
मॉस्को: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या एका घोषणेमुळे रशियात खळबळ उडाली आहे. पुतीन यांनी केलेल्या घोषणेनंतर विमानाच्या तिकीट बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. हजारो नागरिकांनी वन-वे तिकीट बुकिंग केलं आहे. त्यामुळे फ्लाईट्स पूर्ण भरल्या आहेत. विमानाच्या तिकिटांचे दर आभाळाला भिडले आहेत. सैन्याची जमवाजमव करण्याची घोषणा पुतीन यांनी केली आहे. त्याचा परिणाम रशियात दिसू लागला आहे.