बुलढाणा : काही दिवसांपूर्वी बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहणाचा कट रचण्यात आला होता. मात्र आता चांडक यांनी अपहरण कटामध्ये सहभागी असणाऱ्या तीनही युवकांना रोजगार देण्याची किंवा व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेत कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. चांडक यांच्या या कृतीची संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत असून कौतुक करण्यात येत आहे आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘सदर युवकांची माहिती घेतल्यानंतर तीनही युवक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बेरोजगार असल्याने हे तरूण अशा मार्गाकडे वळाले. त्यामुळे मी या युवकांना नोकरी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे,’ असं चांडक यांनी म्हटलं आहे.

सामाजिक कार्याच्या नावाखाली देशविरोधी कृत्य; कशी PFIची स्थापना झाली, काय आहेत आरोप

नेमकं काय आहे प्रकरण?

बुलडाणा अर्बनच्या भाईजी ऊर्फ राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचल्याप्रकरणी दिल्लीतून आयबीने तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. अटक करण्यात आलेले तीनही संशयित बुलडाणा शहरातील रहिवासी असून त्यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी त्या तिघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली होती.

तुम्ही मला राजकारणातून कधीच संपवू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

झटपट श्रीमंत होण्यासाठी आरोपी तरुणांनी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती या दोघांचं अपहरण करण्याचा कट रचला. मिर्झा आवेज बेग, शेख साकीब शेख अन्वर, उबेद खान शेर खान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते बुलडाणा शहरातील शेर-ए-अली चौकातील रहिवासी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here