श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण हद्दीमध्ये काल एका शेतात बिबट्या आढळून आला. शेतामध्ये मोकळ्या मैदानात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या आजारी असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. बिबट्या धापा टाकत होता. त्याला जास्त वेळ डोळेही उघडे ठेवता येत नव्हते.

 

leopard died
अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण हद्दीमध्ये काल एका शेतात बिबट्या आढळून आला. शेतामध्ये मोकळ्या मैदानात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या आजारी असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. बिबट्या धापा टाकत होता. त्याला जास्त वेळ डोळेही उघडे ठेवता येत नव्हते. ग्रामस्थांनी या बिबट्यासोबत फोटो, व्हिडीओ काढले. काही तासांनंतर या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्यासोबत फोटो काढणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

शेतामध्ये कामाला जात असताना काही शेतकऱ्यांना हा बिबट्या दिसला. पडिक शेतामध्ये बसलेला बिबट्या थकलेला होता. तो धापा टाकत होता. पूर्ण वाढ झालेला बिबट्या आजारी असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिथे ग्रामस्थांची गर्दी झाली. बिबट्या हल्ला करणार नाही याची खात्री पटल्यानंतर ग्रामस्थांनी गर्दी केली. अनेकांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत फोटोसेशन केले. व्हिडीओ शूट केले.
तिसऱ्या मजल्यावर जिमला गेले, ते परतलेच नाहीत; औरंगाबादमध्ये प्रसिद्ध बिल्डरनं जीवन संपवलं
बिबट्या आजारी अवस्थेत आढळल्याची माहिती रायगव्हाण येथील तंटामुक्तीचे उपाध्यक्ष गणेश बन्शी शिंदेंनी वन कर्मचारी रणदिवे साहेब यांना कळवली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोहोचून बिबट्याला पकडले. औषधोपचार करून या बिबट्याला जंगलात सोडले जाणार होते. मात्र या बिबट्याचा रात्री मृत्यू झाला. यानंतर आता फोटोसेशन केलेल्या नागरिकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here