मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि उर्वशी रौतेला फिल्म इंडस्ट्रीमधल्या हरहुन्नरी कलाकार आहेत. दोघीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दीपिका सुपरस्टार आहे. तिचे चाहते खूप आहेत. पण बाॅलिवूडमध्येही तिचे फॅन्स आहेत. उर्वशी रौतेलानं हेच दाखवून दिलं.

इन्स्टाग्राम स्टोरीत एका फॅननं उर्वशीची एक क्लिप शेअर केली आहे. त्यात उर्वशी दीपिकाच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे. दोघीही दुबईच्या विमानात आहेत. मुंबईला येतायत. दीपिकानं लांब डेनिम जॅकेट आणि पांढऱ्या स्नीकर्सच्या खाली काळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. तर उर्वशी रौतेलानं काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

अयोध्येचं नवं आकर्षण! लता मंगेशकर चौकात उभारली ४० फुटांची वीणा

उर्वशीनं दीपिकाची घेतली पापी
फोटोत उर्वशीनं दीपिकाचा चेहरा हातात धरून गालावर आपले ओठ टेकवलेत. दोघी दुबईच्या विमानात भेटल्या. दीपिका आपल्या सीटवर उशी जवळ घेऊन बसली होती. शेजारी उर्वशी उभी होती. दीपिकाला नंतर मुंबईत विमानतळावरही अनेकांनी पाहिलं.

उर्वशी आणि दीपिका

व्हिडिओत दीपिकानं दिले धन्यवाद
दीपिका मुंबई विमानतळा बाहेर दिसल्यावर अनेकांचे मोबाइल व्हिडिओ काढायला सरसावले. दीपिकानं सगळ्यांकडे पाहून स्मित हास्य केलं आणि कारमध्ये बसताना तिनं थँक्यूही म्हटलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. एका फॅननं तर म्हटलंय, तिचं स्मित माझ्या मनावर कोरलं गेलं.


ब्रह्मास्त्र सिनेमात दीपिका
अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात दीपिका पाहुणी कलाकार आहे. सिनेमात रणबीरनं शिवाची भूमिका साकारली आहे. त्याचे आईवडील लवकर जग सोडून जातात. सिनेमा पाहून प्रेक्षकांना विश्वास बसला की दीपिकाच रणबीरची आई झालीय.

अजयवर ‘थँक गॉड’ नाही तर’अरे देवा’ म्हणण्याची वेळ! मंत्र्यांकडून बॅन

दीपिकाचे येणारे सिनेमे

पठाण आणि फायटर सिनेमात दीपिका अॅक्शन मोडमध्ये दिसेल. पठाणमध्ये ती शाहरुख खान आणि जाॅन अब्राहमबरोबर आहे. तर फायटर सिनेमात ती हृतिक रोशन आणि अनिल कपूरबरोबर आहे. बिग बींच्या द इंटर्न सिनेमातही ती आहे.

श्रद्धाचा नो मेकअप लूक, तरीही दिसते इतकी सुंदर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here