माहेरी निघून गेलेली पत्नी घरी परत येत नसल्याचा राग मनात धरून एका ६९ वर्षीय वृद्धाने शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे घडली आहे. याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

suicide 1
परभणी: माहेरी निघून गेलेली पत्नी घरी परत येत नसल्याचा राग मनात धरून एका ६९ वर्षीय वृद्धाने शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे घडली आहे. याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बबन गणपत देसाई असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील बबन गणपत देसाई यांच्या पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी निघून गेले होत्या. त्यामुळे बबन देसाई हे मागील काही दिवसांपासून अस्वस्थ झाले होते. पत्नी माहेरवरून घरी येत नसल्याने अखेर बबन देसाई यांनी राग मनामध्ये धरून स्वतःच्या गट क्रमांक २५३ मधील शेत शिवारात आखाड्यावर झोपडीमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
तिसऱ्या मजल्यावर जिमला गेले, ते परतलेच नाहीत; औरंगाबादमध्ये प्रसिद्ध बिल्डरनं जीवन संपवलं
घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे, पोलीस कर्मचारी पंडित, केस गिरी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी मयत बबन देसाई यांचे नातेवाईक मारोती देसाई यांच्या खबरीवरु चुडावा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोहेकाँ. कच्छवे करत आहेत. या घटनेमुळे चुडावा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here