या बरोबरच कालच्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल. मला वाटतं की एक हिंदीमध्ये म्हण आहे. ती अशी की जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात स्वत: पडतो. हीच स्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे.
आम्हाला असं वाटलं होतं की कालच्या सभेत ते एक कबुली देतील. ती अशी की मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मी विसरलेलो आहे, त्यामुळे बाळासाहेबांनी मला माफ करावे, असे ते म्हणतील असे आम्हाला वाटत होते. पण त्यांनी माफी मागितली नाही. माफी न मागता उलट त्यांचा अहंकार लोकांसमोर बाहेर पडला आहे. इतके नक्की आहे आहे की हा अहंकार पाहून मुंबईची जनता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देईल.
ते इतरांवर टीका करतात की हे दिल्लीमध्ये जाऊन झुकतात. मात्र, उद्धव ठाकरे हे दिल्लीत १० जनपथ येथे जाऊन त्यांनी तेथे किती लोटांगण घातले हे महाराष्ट्राची जनता जाणते. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारून त्यांच्याकडून १० जनपथाची जीहुजुरी सुरू होती. फक्त अहंकार आणि अहंकारच त्यांच्याकालच्या भाषणात दिसत होता आणि हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे, असेही राणा पुढे म्हणाल्या.