परभणी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अत्यंत व्यग्रतेमधून वेळ काढून परभणीच्या गंगाखेड येथील एक वर्षाच्या चिमुकलीला पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा भेट दिली आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबाचा आनंद देखील गगनाथ मावेनासा झाला आहे. ओजस्वी गोपाळ मंत्री असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या मुलीचे नाव आहे. (Prime Minister Narendra Modi wrote a letter to Parbhani’s one year old daughter Ojasvi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यग्र असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहित आहे की त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देतात. शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील ते लोकप्रिय आहेत. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमी विद्यार्थ्यांशी परीक्षा, अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विषयांवर संवाद साधतात. पंतप्रधान मोदींचे एक पत्र परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे राहणाऱ्या अवघ्या एक वर्षे वयाच्या ओजस्वी गोपाळ मंत्री या चिमुकलीला मिळाले आहे. ज्यात ‘ओजस्वी’ च्या वाढदिवसानिमित्त थेट पंतप्रधानांकडून शुभेच्छा मिळाल्याने मंत्री कुटुंबाच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अभ्यासाचा कंटाळा आला, रागाच्या भरात १४ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले हे पाऊल
गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगर येथे राहणारे तथा सरस्वती विद्यालयातील सहशिक्षक गोपाळ मंत्री व त्यांची पत्नी अभिलाषा यांची कन्या कुमारी ओजस्वी हिचा प्रथम वाढदिवस दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सुद्धा १७ सप्टेंबर रोजी होता. या अनुषंगाने गोपाळ मंत्री यांनी पंतप्रधान कार्यालयाशी थेट संपर्क साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून प्रत्यक्ष आशीर्वाद देण्याविषयी विनंती केली होती. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव ती नाकारण्यात आली.

मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, मग मैदानात नेऊन महिलेला संपवलं, परभणीत थरार
संपूर्ण शहरात पत्राचीच चर्चा

परंतु एका सामान्य नागरिकाच्या एका साध्या विनंतीची दखल स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी घेऊन आपला वैयक्तिक शुभेच्छा संदेश स्पीड पोस्टच्या माध्यमातून मंत्री परिवाराला पाठवला. या पत्राची संपूर्ण शहरात चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. कारण परभणी जिल्ह्यात प्रथमच एखाद्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त थेट देशाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा मिळणे ही निश्चितच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

माहेरी गेलेली पत्नी परत येईना; वृद्ध पती संतापला, शेतात जाऊन उचललं टोकाचं पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here